spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते प्रकल्प कार्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- एकात्मिक आदिवसी विकास प्रकल्प कार्यालय येथे दिनांक १९ ऑक्टोंबर रोजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत पीएम जनमन अंतर्गत धरकूल, विजपुरवठा, धरती आबा, पानीपुरवठा, अतिवृष्टी, रस्ते यासह विविध महत्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला,या बैठकीत संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या. आढावा बैठकीकरिता आमदार राजू तोडसाम, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन, उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बंसल, तहसीलदार राजेंद्र इंगळे, गटाविकास अधिकारी भिमराव वनखंडे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्धाटन करण्यत आले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, उपक्रम, प्रकल्पांची माहिती आदिवासी बांधवांना सहज उपलब्ध होणार आहे, तसेच ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिजीटल माध्यमातून पारदर्शक व परिणामकारक शासन ही काळाची गरज असून, या संकेतस्थळाच्या माध्यमातून आदिवासी विकास प्रकल्पांची माहिती थेट आदिवासी बांधवा पर्यंत पोहोचेल, असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितले. याप्रसंगी विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

या संकेतस्थळाला लिंक व सोबतच्या क्यु-आर कोडच्या माध्यमातून भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळवावी तसेच आपल्या तक्रारी ऑनलाइन वरील लिंकवर किंवा क्यु-आर कोडवर नोंदवाव्यात 

– अमित रंजन,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पांढरकवडा

Popular Articles