कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल कॉलेजच्या विशेष दिवस कार्यक्रम समितीतर्फे छत्रपती शाहू महाराजांच्या १०४ व्या पुण्यतिथी दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवातीला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या छायाचित्राला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विशेष दिवस कार्यक्रम समितीचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र सावजी तागडे यांनी शिक्षण, आरक्षण, महिला सक्षमीकरण, शेतकर्यांच्या समस्या, जल सिंचन व सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या योगदनाचा आढावा घेतांना तळागाळातील लोकांसाठीचे त्यांचे धोरण स्पष्ट केले. महाविद्यालयाचे रजिस्ट्रार स्वप्नील राठोड यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या वैचारिक वारासयाची समाजाला असलेली प्रसंगिकता विषद केली. याप्रसंगी रमेश पालेवाल, सुनील भालकर, अच्युत रामेश्वर, किशोर गबड, विवेक मेश्राम, धिरज कानोजिया, कुणाल कडू, धिरज बेहर, उमेश बांगर, आनंद वानखेडे, अमर वानखेडे, निलेश रंगारी, महेश इरपाते, महेश कुंभरे, विद्या मानवटकर, विककी समुद्रे, सुनील राकडे, शिलाबाई बावनकुळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल शिल्पा हिरेखण तर आभार हेमंत शर्मा यांनी मानले.
पोरवाल महाविद्यालयात पुण्यतिथी दिनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन !
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.