spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुचाकी चोरीचा गुन्हा उघड, २ आरोपी निष्पन्न

वडोदा :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण आणि शशांत एन एम सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी कन्हान उपविभाग यांच्या मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक मनोज गदादे, प्रभारी आधिकारी पोलीस स्टेशन वडोदा यांच्या नेतृत्वात वडोदा पोलीसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा उघड करत दोन आरोपींना निष्पन्न करून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, फिर्यादी गोविदा केशवराव मातिबाये, वय ६८ वर्षे, रा. सावळी, ता. कामठी, जि. नागपूर हे त्यांची अॅक्टिव्हा दुचाकी क्रमांक एम एच ४० बी एस ५८५६ ने मौजा कडोली शिवार येथे गेले होते. त्यांनी सदर दुचाकी शेतासमोर उभी करून शेतात गवत कापण्यासाठी गेले असता, परत आल्यानंतर त्यांना दुचाकी उभ्या केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन वडोदा येथे दुचाकी चोरीची तक्रार दिली. सदर प्रकरणी पोलीस स्टेशन वडोदा येथे कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस स्टेशन वडोदा येथील तपास पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे दिनांक ०९/११/२०२६ रोजी आरोपी १) प्रकाश मत्तनसिंग धुर्वे, वय २१ वर्षे रा कोमो खुशीपार सिजोरा, ता बैहर जि बालाघाट आणि २) सुरज अनुप पन्द्रे, वय १९ वर्षे, रा. वार्ड क्र १४ अरंडी ता वैहर जि बालाघाट दोघेही ह.मु गुमथळा ता. कामठी जि. नागपुर यांचा शोध घेऊन त्यांना महालगावातून ताब्यात घेतले. आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी मिळुन सदर दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याची माहीती दिली. आरोपींच्या ताब्यातुन चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी क्रमांक एम एच ४० वी एस ५८५६ किंमती ४०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Popular Articles