spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या ५२ जुगार खेळणाऱ्या आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद

– ५३ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

कन्हान :- कन्हान पोलीसांना गोपनिय बातमीदारा मार्फतीने खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा खदान नं. ३, मरगटी मैदान आंगणवाडी चे मागे खुल्या जागेत सार्वजनिक ठिकाणी काही इसम ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळत आहे. पोलीसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली असता आरोपी नामे १) फैजान खान वल्द तोहीद खान, वय २३ वर्षे, रा. पार्वती नगर कळमना नागपुर, २) मनोज कुमार जयनाथ चव्हाण, वय ३९ वर्षे, रा. जे.एन. रोड, कांद्री, कन्हान ३) सत्येंद्र उर्फ सैय्यद लालसिंग चव्हाण, रा. खदान नं. ३. ता. पारशिवनी, आणि ४) प्रदीप ठाकुर, रा. खदान नं. ३ ता. पारशिवनी यांच्या विरुद्ध कलम १२ अ म.जू.का. अन्वये नोंद करण्यात आला.

पोलीसांनी पंचाासमक्ष ५२ ताशपत्ते, एकुण रोख रक्कम ३१५०/- रुपये, मोटार सायकल क्र. एम.एच. ४० झेड ०४३९ आणि इतर साहीत्य असा एकुण ५३,२००/-रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.

Popular Articles