spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बनावट ई-मेलद्वारे सिमकार्ड मिळवून कंपनीचे ३३.७१ लाख लांबवले

पिंपरी :- कंपनीच्या अधिकृत ई-मेलशी साधर्म्य असलेल्या बनावट ई-मेलद्वारे मोबाइल कंपनीकडून त्याच क्रमांकाचे दुसरे सिमकार्ड मिळविले. त्यानंतर नेट बँकिंगद्वारे कंपनीच्या खात्यातून ३३ लाख ७१ हजार रुपये लांबवले. हा प्रकार ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत निगडी प्राधिकरणात घडला. अज्ञात ई-मेलधारक, फसवणुकीची रक्कम जमा झालेल्या बँक खात्यांचे धारक आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अतुल अशोक इनामदार (वय ५१, रा. सेक्टर २७-अ, प्राधिकरण, निगडी) यांनी शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. इनामदार यांच्या एसएआर इंडस्ट्रीज कंपनीच्या ई-मेलसारखा बनावट ई-मेल तयार करण्यात आला. त्याद्वारे एअरटेल कंपनीशी संपर्क साधून बँक खात्याशी जोडलेले सिमकार्ड बंद करून त्याच क्रमांकाचे नवीन सिमकार्ड मिळविले. त्यानंतर नेट बँकिंगचा गैरवापर करून ३३ लाख ७१ हजार रुपये परस्पर वर्ग केले.

Popular Articles