spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पहिल्या मजल्यावरून पडून अविवाहित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; जैस्वाल कुटुंबावर शोककळा

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविदास नगर परिसरात राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने ३० वर्षीय अविवाहित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गतरात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जैस्वाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत तरुणाचे नाव ऋषभ प्रकाश जैस्वाल (वय ३०, रा. रविदास नगर, कामठी) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ हा घराच्या पहिल्या मजल्यावर असताना अचानक खाली पडला. पडल्याचा मोठा आवाज ऐकून घरात असलेली त्याची बहीण तातडीने बाहेर धावली. त्यावेळी ऋषभ गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती.

कुटुंबीयांनी कोणताही विलंब न करता त्याला उपचारासाठी कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच उपस्थित डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषभच्या पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार असून, कुटुंबाचा आधारवड हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेची नोंद नवीन कामठी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Popular Articles