spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान नगरपरिषदेत सभापती पदांची बिनविरोध निवड

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी येथिल विषय समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. यात आरोग्य व स्वच्छता सभापती उपाध्यक्ष रिंकेश चवरे, पाणीपुरवठा सभापती आशा महोतो, बांधकाम सभापती केतन भिवगडे, महिला व बालकल्याण सभापती योगिता भलावी तर उपसभापती प्रियंका ठाकुर (हटवार), नियोजन व विकास सभापती प्रशांत पाटील आदीची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली.

गुरूवार (दि.२९) ला नगरपरिषद कन्हान – पिपरी येथे विविध विषय समित्यांच्या सभापती पदा साठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. सर्व पदांसाठी एकमताने अर्ज दाखल झाल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. निवडणुक अधिकारी म्हणुन मुख्याधिकारी दीपक घोडके यांनी कामकाज पाहिले, तर नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या अध्यक्षतेत ही प्रक्रिया पूर्ण झाली.

गटनेते मनोज कुरडकर यांनी सभापती पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे अर्ज सादर केले. यात आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदी नगरपरिषद उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांची बिनविरोध निवड झाली. पाणीपुरवठा समिती सभापती आशा आकाश महोतो, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी केतन भिवगडे, महिला व बालकल्याण समिती सभापती योगिता भलावी यांची, तर उपसभापती पदी प्रियंका लक्की ठाकुर (हटवार) यांची निवड करण्यात आली. तसेच नियोजन व विकास समिती सभापती पदी प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . या निवडणुक प्रक्रियेस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह (गजु) यादव, कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग, महामंत्री सचिन वासनिक, राजन विनयवार, सुरेंद्र बुधे, देवेंद्रसिंह सेंगर, कन्हान शहर अध्यक्ष महेंद्र साबरे, महामंत्री मयुर माटे यांच्यासह नगरसेवक शिव शंकर (चिंटु) वाकुडकर, विनोद किरपान, शक्ती पात्रे, नगरसेविका सुषमा चोपकर, पूनम राठी, सुचित्रा माटे, मोनिका पौनिकर, लक्की ठाकुर, आकाश महातो, अतुल गजभिये सह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

निवडणुक बिनविरोध पार पडल्याने नगरपरिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असुन नव्याने निवडुन आलेल्या सभापतींकडुन शहराच्या विकास कामांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Popular Articles