spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पिंपरी-कन्हान येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक उत्सव 

– अनेक वर्षाची परंपरा आजही कायम. 

कन्हान :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कन्हान लगतच असलेल्या पिंपरी येथे पावन श्री हनुमान मंदिर समिती पिंपरी च्या व्दारे रामजन्मोत्व ते हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात दैनंदिन सकाळ, सायंकाळ पुजा, अर्चना, आरती करून भजन गायन केल्या जात आहे.

उल्लेखनीय आहे की, पुरातन पावन हनुमान मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान असुन अनेक भाविकां च्या मनोकामना पूर्ण होत असल्याचे येथील भाविक सांगतात. श्रद्धेने या कार्यक्रमाला ठिकठिकाणावरून भाविक मंदिरात नतमस्तक होत असल्याचे आख्यायि का आजही कायम आहे. या मंदिरातील अनेक पुजारी आपली सेवा देत आपले आयुष्य समर्पित केले आहे. पुढील परंपरा कायम रहावी यासाठी सामाजिक कार्य कर्ते सुरेश ठाकरे यांनी आपली भूमिका गावातील अनेक भाविकांच्या सहकाऱ्याने सुरू ठेवली आहे. गुरूवार (दि.२) एप्रिल २०२६ ला श्री हनुमान जन्मोत्स व साजरा करण्यास भजन, दहीकाला करून उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

श्री हनुमान हे हिंदु धर्मातील अत्यंत पूज्य, शक्ति शाली आणि चिरंजीवी (अमर) देवता आहेत. अंजनी आणि केसरीपुत्र तसेच वायुपुत्र मानले जाणारे हनुमान हे श्रीरामांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या जीवनात अपार शक्ती, भक्ती, बुद्धिमत्ता, विनम्रता आणि समर्प ण या गुणांचा सुरेख संगम पाहायला मिळतो, जे राम चरितमानस आणि रामायणातील मुख्य आकर्षण आहे . चैत्र पौर्णिमेला (हनुमान जयंती) अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. बालपणी त्यांनी सूर्याला फळ समजुन गिळण्याचा प्रयत्न केला होता. [हनुमान हे भगवान शंकराचा ११ वा रुद्रावतार मानले जाते. रामायणातील मुख्य पात्रांपैकी एक असलेले हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त, ते बल, बुद्धी, विद्या आणि निस्सी म भक्तीचे प्रतिक आहेत. लहानपणी इंद्राच्या वज्राचा प्रहार त्यांच्या हनुवटीवर (हनु) लागल्यामुळे हनुवटी वाकडी झाली म्हणुन त्यांना ‘हनुमान’ हे नाव पडले.

Popular Articles