किशोर साहू, मौदा :- अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्ताने ग्रामपंचायत चाचेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यानिमित्य गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या प्रसंगी लूंबिनी महेश कलारे सरपंच ग्रामपंचायत चाचेर, रवींद्र ठाकरे उपसरपंच, सुरेंद्र टेंबरे, शैलेश कोपरकर, नलू दरवाई, शेखर देवगडे, रामा खडसे, आकाश राऊत, अमर अडकणे, जगदंबा युवा प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते संकेत खडसे, गौरव खडसे, आदित्य काळे, गुणरत्न हुमने, चंदू देऊळकर सह ग्रामस्थ उपस्थित होते.




