पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती कामठी अंतर्गत विविध विभागांचा संयुक्त ग्राम भेट दौरा पार पडला. सदर कार्यक्रम ग्रामपंचायत कवठा येथे राबविण्यात आला
पात्र लोकांना विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात आली व गावातील कुटुंबांना भेट देऊन साथरोग प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात आल्या.
कामठी ७ : तसेच सदर ठिकाणी पोर्टेबल एक्सरे मशीन आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली होती त्यमध्ये टीबी चे संशयित रुग्ण व इतर व्यक्ती यांच्या गावस्तरावर एक्सरे ची सुविधा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत राबून नागरिकांचे आरोग्य तपासणी व ३२ एक्सरे काढण्यात आले व सीबीएनएट २३ तपासण्या करण्यात आल्या त्यामुळे सदर सुविधा गावस्तरावर उपलब्ध करण्यात आल्यामुळे जनतेला नागपूर किवा कामठी ला जाण्या येण्याचा खर्च वाचला असल्याचे सरपंच श्री निलेश डाफरे यांनी यावेळी सांगितले.तसेच महिलांची आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व अंगणवाडी येथील बालकांचे वजन प्रत्यक्ष घेऊन तपासणी आरोग्य शिबिर घेण्यात आले
पाणीपुरवठा, स्वच्छता, अंगणवाडी, शाळा यांची पाहणी
सरकारी योजनांची अंमलबजावणी, नरेगा, आवास योजना व इतर प्रकल्पांचे निरीक्षण
विविध विभागांचे अधिकारी व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते
ग्रामस्थांसोबत थेट संवाद साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न मा तहसीलदार,मा गटविकास अधिकारी,बाळासाहेब यावले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोटे व वैद्यकीय अधिकारी गुमठी डॉ अन्सारी इतर तालुका प्रशासन अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी खसाळा आरोग्य सहायक आशा यांनी यावेळी हजर राहून प्रत्यक्ष नागरिकांचे समस्यांचे निवारण केले.सदर गावभेट करताना सरपंच निलेश डाफरे व सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभ








