spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रवास व पर्यटन विभागाद्वारे भंडारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट

नागपूर ८ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागातील एम.ए.च्या विद्यार्थ्यांनी भंडारा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देत ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेतली. भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी, विरली खंदार, निपाणी पिंपळगांव, तिलोता खैरी व पवनी या पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश होता.

प्रवास व पर्यटन अभ्यासक्रम अंतर्गत असलेल्या विविध पर्यटन स्थळांची आयटेनरी बनवून त्या स्थळांचे पर्यटन महत्व ओळखून देण्यात मदत करतात. या स्थळापर्यंत पर्यटकांना पोहचविण्याकरीता व स्थानिक पर्यटनाला चालना देण्याकरीता भंडारा जिल्ह्यातील या स्थळांना भेट द्यायचे ठरले व प्रवास व पर्यटन अभ्यासक्रम शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्थळांना भेट देण्याकरीता पूर्ण आयटनेरी बनवून त्यांच्या अंमलबजावणी करीता २५ ऑगष्ट २०२५ रोजी भंडारा जिल्ह्यातील रावणवाडी, विरली खंदार, निपाणी पिंपळगांव, तिलोता खैरी व पवनी महत्वपूर्ण पर्यटन स्थानाला भेट दिली. पर्यटन प्रमोशन करीता पर्यटकांसोबत स्थानीय सरकारच्या योगदानावर चर्चा केली. अभ्यास प्रक्रियेतील या महत्वपूर्ण अध्यायाला पूर्ण करण्याकरीता विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे तसेच प्रा. नेहा दुबे-पांडे, मंजूषा डोंगरे-चौहाण, डॉ. अमरदीप बारसागडे, परीमल सुराडकर व मनोज वाहणे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा काठावरील पवनी, तिलोता खैरी, निपाणी पिंपळगांव, विरली खंदार, रावणवाडी, आंभोरा या महत्वपूर्ण एतिहासिक व पुरातात्वीक पर्यटन स्थळांना अभ्यासपूर्ण भेट देण्यात आली.

या भेटीत इतिहास, बालक व वरीष्ठ लोकांच्या पर्यटनासाठी असलेल्या सोयी-सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. शिवाय थांबण्याचे ठिकाण, चहा-पाणी  स्थळ व निवासा करीता आवश्यक बाबी या विषयी एमटीडीसीचे रिर्साट व उमरेड- क-हाण्लाचे पवनी येथील गेट व पवनी येथील स्तूप, किल्ला, बाल तलाव व इतर पर्यटन स्थळांना भेट देण्यात आली. स्थानीय पर्यटनाची माहिती विद्यार्थ्यांनी परिचीत करून घेतली. या भेटी करीता प्रवास व पर्यटन विभागातील शिक्षक, एम.ए. प्रथम व व्दितीय वर्ष च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यात पुजा बागडे, भूमिका गावंडे, पवन पातार, छोटू शेंडे, अमोल नगराळे, वैभव शिंगणजुडे यांचा समावेश होता.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.