– जिल्हाध्यक्ष घोरमारे यांचे मार्गदर्शन
बेला :- व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या शाखेची बेला येथे नुकतीच स्थापना करण्यात आली. यावेळी पहिली बैठक नागपूर जिल्हाध्यक्ष दिलीप घोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेला फोरमचे रामटेक येथील राजू कापसे, कान्होलीबारा येथील नीलम चकोले व हिंगणा येथील विनायक इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत संघटनेच्या विस्तारासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, संघटन अधिक मजबूत करणे, नवीन सदस्य नोंदणी, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक विचारमंथन करण्यात आले.
यानंतर बेला शाखेच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यानुसार सिर्सी येथील पुंडलिक कामडी यांची अध्यक्षपदी तर बेला येथील उत्तम पराते यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. याशिवाय,खुशाल वैद्य व कैलास साठवने उपाध्यक्ष, चंद्रशेखर भेंडे सहसचिव, संदीप धंदरे कोषाध्यक्ष, अमित नवनागे प्रसिद्धीप्रमुख आणि रवी पराते यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.तसेच अखिल रोडे, दिलीप माथनकर आणि रोशन मेहरकुरे यांची सभासद म्हणून निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सरते शेवटी व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम एक संघ ठेवण्याचा सर्वांनी निर्धार केला.





