spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

– २९ सप्टेंबरला अधिसूचना

– ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार

– २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी

– नागपूर विभागात आदर्श आचारसंहिता लागू

नागपूर :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासह राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ अशी राहणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून, ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर आहे. २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाल्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत संबंधित सहाही जिल्ह्यांमध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पार पाडण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २९ सप्टेंबर रोजी अधिसूचना, ६ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, ७ ऑक्टोबर अर्जांची छाननी, ९ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, २३ ऑक्टोबर मतदान आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.