spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुलाच्या उपचारासाठी रुग्णालयात गेल्या, मागे घरफोडी; ₹42 हजारांचा ऐवज लंपास

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रमणी नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून ₹42 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत मीनाक्षी विनय बोरेकर (वय 40, रा. चंद्रमणी नगर, कामठी) यांनी नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार या आपल्या मुलाला उपचारासाठी सायंतारा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या. उपचारानंतर त्या घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

चोरट्यांनी घरातून सुमारे पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 20 ग्रॅम चांदीची पायपेटी, 1.5 ग्रॅम सोन्याची नथ आणि दोन हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.