Related Posts

ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांना अधिक गती देणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> ओबीसी व इतर वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व उन्नतीसाठी राज्य शासन अनेक योजना&comma; उपक्रम राबवित असून या योजनांना अधिक गती दिली जाईल&comma; असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत&comma; डॉ&period;परिणय फुके आणि राठोड यांनी सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री सावे यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले की&comma; परदेशी शिष्यवृत्ती योजना सन २०१७ मध्ये फक्त १० विद्यार्थ्यांपुरती मर्यादित होती&period; या कोट्यात वाढ करण्यात येऊन हा कोटा प्रथम ५० आणि आता ७५ विद्यार्थ्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे&period; या पुढील काळात हा कोटा आणखी वाढविण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>म्हाडा व सिडको मार्फत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांमध्ये आरक्षण संदर्भात विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करण्यात येईल&period; इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी सात जिल्ह्यात जागा मिळाली असल्याचे सांगत सावे म्हणाले&comma; मोठ्या शहरात इमारती भाड्याने घेऊन वसतिगृह सुरू केली जातील&period; ज्या विद्यार्थ्यास वसतीगृहात प्रवेश मिळाला नसेल त्याला आधार व स्वयंंयोजनेचा लाभ दिला जात आहे&period; तसेच परदेशातील शिक्षणासाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज महामंडळातून&comma; तर देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे&period; कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी ऑनलाईन पोर्टल व मॉनिटरिंग प्रणाली तयार करण्यात आली असल्याचेही मंत्री सावे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;