Home Latest News 2 सप्टेंबर चा जीआर रद्द करण्यासाठी विधान भवनावर घेराव घालणार – प्रकाश...

2 सप्टेंबर चा जीआर रद्द करण्यासाठी विधान भवनावर घेराव घालणार – प्रकाश अण्णा शेंडगे

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>राज्यस्तरीय ओबीसी चिंतन शिबिर एमटीडीसी गेस्ट हाऊस नागपूर या ठिकाणी संपन्न झाले&period; विविध सामाजिक संघटनांचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी सदर चिंतन शिबिरामध्ये उपस्थित होते&period; 2 सप्टेंबर 2025 चा जीआर रद्द करण्यासाठी 7&comma; 8 व 9 डिसेंबर 2025 ला धरणे आंदोलन आणि 10 तारखेला सर्वव्यापी सकल बहुजन समाजाच्या विधान भवनाला घेराव आंदोलन करण्याच्या संदर्भातली भूमिका उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली&period; त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी जी नेते मंडळी ओबीसी जागृती करता कार्यरत आहे&comma; त्या सर्व नेतेमंडळींशी चर्चा करून आणि त्यांचा होकार मिळाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल अशा पद्धतीची भूमिका उपस्थित सर्व राज्यव्यापी ओबीसी नेत्यांनी सदर बैठकीमध्ये आपले मत व्यक्त केलेले आहे&period; राज्य सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 सप्टेंबर 2025 चा जीआर रद्द करण्याकरिता भाग पाडावे त्याकरता जनजागृती करावी आणि प्रत्येक ओबीसी जात समूहाला या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता प्रेरित करावे&comma; ही भूमिका सुद्धा बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार तथा ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे यांनी व्यक्त केली&period; ओबीसी क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ&period; कृष्णाजी बेले यांनी मान्यवर कांशीरामजींनी ज्या पद्धतीने समाजामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला&period; आणि संपूर्ण देशांमध्ये बहुजनांची लहर निर्माण केली मंडल आयोग लागू करून घेतला&comma; तीचभूमिका आता ओबीसींनी स्वीकारावी अशा पद्धतीचे मत याप्रसंगी व्यक्त केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-19212 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;1003815054&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x645&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"645" &sol;><&sol;p>&NewLine;<p>ओबीसी जन मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ&period; ज्ञानेश्वर गोरे यांनी महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठांमध्ये 18 ते 30 वयोगटातील मुला-मुलींना पाच पाच दिवसाचे दर महिन्याला प्रशिक्षण दिल्या जाते&period; त्यांना चळवळीची भूमिका समजावून सांगितल्या जाते त्याकरता आपलं सहकार्य असावं ही भूमिका व्यक्त केली&period; कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा&period; रमेश पिसे यांनी एकंदरीतच ओबीसी चळवळ आता मोठ्या प्रमाणात जागृतीच्या दिशेने कार्यरत आहे&period; ओबीसी सोबत एससी&comma; एसटी आणि मायनॉरिटी च्या लोकांना सुद्धा आपण सोबत घेऊन&comma; आपलं सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय भवितव्य उज्वल करण्यासाठी प्रयत्नरत राहावं अशी भूमिका मांडली&period; ओबीसी युवा अधिकार मंचचे उमेश कोराम यांनी १० तारखेचा मोर्चा यशस्वी करण्याकरता माजी विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे गटनेते विजय वडेंटीवार यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि तमाम महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना सहकार्य केलं त्याकरता आपण सगळ्यांनी त्यांचेही अभिनंदन केलं पाहिजे हा ठराव मांडला&period; सभागृहाने एकमताने सदर ठराव मंजूर केला&period; ओबीसी बांधवांना जागृत करण्याकरता एकत्रित येऊन पुढचा लढा आता आपण घडला पाहिजे असे मत डॉ&period;विलास काळे यांनी व्यक्त केले&period; ओबीसी आंदोलन चालवण्यासाठी महिला व मुलींना मुलांना ही सगळी चळवळ आपण समजावून सांगितली पाहिजे अशी भूमिका सुनीता काळे यांनी मांडली&period; पाटी लावा अभियानच्या प्रमुख एडवोकेट अंजली साळवे यांनी चळवळ कशी मोठी केली पाहिजे त्याकरता केलेल्या कार्याचा इतिवृत्तांत सादर केला&period; एडवोकेट समीक्षा गणेशे यांनी ओबीसी वकील महासंघ हा या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत राहील या पद्धतीची भूमिका मांडली&period;<img class&equals;"alignnone wp-image-19213 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;1003815054&lowbar;1&lowbar;copy&lowbar;792x558&period;jpg" alt&equals;"" width&equals;"792" height&equals;"558" &sol;><&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी संपूर्ण विदर्भातून प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी आले होते जेष्ठ मार्गदर्शक नागेश चौधरी यांनी इथली व्यवस्था कशी आपला शोषण करत आहे याची भूमिका मांडली&period; मुस्लिम ओबीसी चे नेते जावेद पाशा कुरेशी यांनी राजकीय भूमिका ओबीसीच्या विरोधी शासन कशा पद्धतीने निर्माण करत आहे&comma; आणि आपल्या पायावर आपण जागृत झालो नाही तर आपणच गोटा पाडून घेऊ तो गोटा पडू द्यायचा नसेल तर हा जीआर रद्द करून फार गरजेचा आहे या पद्धतीची भूमिका व्यक्त केली&period; गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी सुद्धा याप्रसंगी आपले मत व्यक्त केले&period; कार्यक्रमांमध्ये एक महत्त्वपूर्ण ठराव वर्धा येथील युवा ओबीसी कार्यकर्ते नेते प्रफुल गुल्हाने यांनी मांडला की ज्यांनी २ तारखेचा काळा जी आर काढला त्यांना आता ओबीसी कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही या पद्धतीचे बोर्ड गावागावात वार्डा -वार्डात प्रत्येक चौफुलीवर&comma; ओबीसी बांधवांनी लावावे आणि त्याकरता सभागृहाने त्याला मान्यता दिली&period; कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंदना वनकर&comma; संजय सोनटक्के&comma; सुरेश वंजारी डीपी वंजारी&comma; उमेशचंद्र चिटकुले&comma; रामदास माहुरे&comma; देविदास आगरकर&comma; अशोक सांबारे&comma; एचडी भडके&comma; पुरुषोत्तम कांमडी&comma; अशोक काकडे&comma; विश्वघोष सोमकुवर&comma; डॉ&period;अनिल कुमार नागबोध&comma; नंदू नागरकर&comma; चंद्रपूर सतीश मालेकर चंद्रपूर&comma; विठ्ठल गजभिये&comma; महेश गिरी&comma; मोहन डोंगरे&comma; वत्सल देशमुख&comma; महेश वैरागडे &comma; संदीप बुटले&comma; सत्यशोधक प्रबोधनकार&comma; अरविंद माळी&comma; सुधाताई बामपल्लीवार&comma; नागपूर शुभांगी घाटोळे&comma; कमल खंडारे&comma; माधवी पंचबुद्धे&comma; नथू रोकडे&comma; आकाश वैद्य&comma; प्रा&period; सतीश आढाव&comma; अर्चना बर्डे&comma; एड&period; सुषमा भड&comma; किशोर थोटे&comma; संजय वर्हेकर&comma; अमरावती&comma; जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष शेखर सावरबांधे&comma; युवा ज्येष्ठ नेते नितीन कुंभलकर&comma; किशोर चेन्नई संजय रामटेके&comma; डॉ&period; नितीन भुते&comma; नंदू थोटे हर्षल सातफळे&comma; सुखदेव वंजारी&comma; अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण पेटकर&comma; इंजिनिअर संजय नासरे भंडारा&comma; उत्तमराव शेलकर&comma; तालुका सचिव राहुल पडोळे&comma; निलेश गुल्हाने&comma; संजय रामटेके&comma; सुरेश वडतकर&comma; अनिल संभाजी जिपकाटे&comma; यवतमाळ प्रफुल गुल्हाने&comma; ज्ञानेश्वर रायमल&comma; किशोर सुरकर&comma; किशन कांबळे&comma; विजय हटवार&comma; भास्कर बेलसरे&comma; महादेवराव खरे&comma; डॉ&period; नितीन बुटले&comma; डॉ&period; अशोक भांगडकर&comma; बाबा बिडकर&comma; अनुज हुलके अरुण गाडे&comma; रवी पटोले&comma; अरुण गाडे&comma; कमलेश वासेकर&comma; चित्रा जुमडे&comma; सुशील झुंबडे&comma; अमोल नंदुरकर&comma; विनोद लांबाडे&comma; माजी नगरसेवक चंद्रपूर आधी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात सदर चिंतन शिबिर यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते&period; कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ&period; विलास काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना वनकर यांनी केले 13 जण जे ओबीसी आंदोलना करिता शहीद झाले त्यांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली&period; जय ओबीसी म्हणत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version