spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वंदे मातरम् उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात

– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शौर्य पदक विजेत्या सैनिकांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ एम्प्रेस मिल परिसरात उभारण्यात येत असलेल्या वंदे मातरम् उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.१७) पाहणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एम्प्रेस मिल परिसरात एक लाख चौरस फूट जागेत ‘वंदे मातरम्’ हे वैशिष्ट्यपूर्ण उद्यान साकारल्या जात आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उद्यानाच्या पाहणी दरम्यान आयुक्तांसोबत अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपायुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता गिरीश लिखार, राजेंद्र राठोड, प्रशांत सोनकुसळे, उद्यान संवर्धक अमोल चौरपगार, उपअभियंता संजय इंगळे, पुरुषोत्तम फाळके, वंजारी, कनिष्ठ अभियंता  संजय पुरी, वस्तू शिल्पकार प्रियदर्शन नागपूरकर, स्प्नील आष्टीकर, अविनाश शाहू, आदी उपस्थित होते.

वंदे मातरम् उद्यान हे युध्दात शहीद झालेले सैनिक, शौर्य पदक प्राप्त सैनिक, माजी सैनिक, युध्दात वीरगती प्राप्त करणाऱ्या सैनिकांच्या पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित असणार आहे. उद्यानातील विकास कार्य जोमात सुरू असून, कार्य आता अंतिम टप्प्यत आले आहे. उद्यानाचे लोकार्पण करण्यासाठी उर्वरित कामे नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्यात यावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. विशेष म्हणजे, अम्पी थिएटर, इंडिया गेटचे काम जोरात सुरू असून, हे काम या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. या उद्यानात नागरिकांना ‘लाईट अँड साऊंड शो’ बघता येणार आहे. यासाठी आवश्यक कामाची पूर्तता करण्यात यावी, तसेच या परिसरात असलेल्या ऐतिहासिक एम्प्रेस मिलच्या चिमणीचे मजबुतीकरण करण्यासह प्रकाश व्यवस्थेची सोय करण्याचे ही निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.

उद्यानातील काम प्रगतीपथावर असून, परमवीर चक्र विजेत्यांचे म्युरल, लहान मुलांसाठी खेळणी, स्काय वॉक आणि पादचारी मार्ग तयार झाला आहे. उर्वरित काम करणे आवश्यक असून, याला पूर्णत्व देणे गरजेचे आहे, असे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सुचविले. तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासंदर्भात आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Popular Articles