spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जागतिक एड्स दिवस कार्यक्रम ममता HIMC प्रोजेक्ट जागृती 

गुमगाव :- जागतिक एड्स दिवसाचे औचित्य साधत प्राथमिक आरोग्य केंद्र, गुमगाव येथे MAMTA HIMC -प्रोजेक्ट जागृती यांच्या वतीने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी जागरूकता निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती पोहोचवणे हा होता. कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुणुका जयस्वाल, ANM निर्मला सतई, हिंगणा ग्रामीण रुग्णालयातील ICTC च्या समुपदेशिका दीपाली, तसेच ममता च्या राज्य समन्वयीका पल्लवी भांडारकर या मान्यवर उपस्थित होत्या.

यावेळी संस्थेच्या आशा वर्कर्सही उपस्थित होते. या कार्यक्रमात गावातील गर्भवती माता, स्तनदा माता, नवविवाहित दाम्पत्ये व किशोरवयीन मुली यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मार्गदर्शिकांनी एचआयव्ही / एड्सची माहिती, संक्रमण कसे होते / कसे होत नाही, प्रतिबंध, सुरक्षित मातृत्व, चाचणीचे महत्त्व याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांकडून “एचआयव्ही / एड्स प्रतिबंध व जागरूकता” शपथही देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन ममता HIMC चे सुपरवायझर योगेश राठोड आणि मंजुषा नासरे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.