spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोदेगांव येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या…

खापा :- खापा पोलीस स्टेशन हद्दीतील कोदेगांव येथिल एका तरुणाने घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवार (ता.२४ डिसें.) ला सायंकाळी ५:४५ वा. दरम्यान ऊघडकीस आली. प्रकाश बुद्दुलाल परतेती (वय १८ वर्ष ) असे मृतक युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई व भाऊ कामाला गेले होते. घरी कुणी नसताना प्रकाशने घरातील दारे बंद करून मधल्या खोलीतील लाकडी फाट्याला साडी बांधुन गळफास लावून आत्महत्या केली. प्रकाशची आई कामावरून घरी परत आल्यावर दार बंद होते. दार ऊघडले व मधल्या खोलीत तीला मुलगा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसुन आला. तिने आरडाओरडा केला असता आजुबाजुचे शेजारी जमा झाले. या घटनेची माहिती खापा पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह हितेश बन्सोड यांच्या रूग्णवाहीकेने सावनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आत्महत्याचे नेमके कारण काय? हे अद्याप कळू शकले नाही. खापा पोलीस पुढील तपास करीत आहे.

Popular Articles