Home Latest News डोक्याला मार लागल्याने पालांदूराच्या तरुणाचा मृत्यू, गोंडेगाव येथील घटना

डोक्याला मार लागल्याने पालांदूराच्या तरुणाचा मृत्यू, गोंडेगाव येथील घटना

0

<p><strong>भंडारा ९ &colon;<&sol;strong> भंडारा पोलिस ठाणे हद्दीतील पालांदूर-मानेगाव राज्यमार्गावरील गोंडेगाव येथील तलावाजवळील वळणावर सोमवारी सायंकाळी ५&period;०० वा&period; उभ्या असलेल्या मानव विकास एस&period;टी&period;बस वर दुचाकी आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार आशिष रमेश गोंडाणे &lpar;३७&comma; रा&period; पालांदूर&rpar; यास गंभीर दुखापत झाल्याने लाखनी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती केल्यानंतर कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>विहीरगाव वरून पालांदुरमार्गे लाखनीकडे जाणारी मानव विकास एसटी बस &lpar;एमएच ०६ एस&period;८८३४&rpar; ही गोंडेगाव जवळून जात असताना समोर म्हशींचा कळप आल्याने बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती&period; त्याचवेळी विरुद्ध दिशेने दुचाकीस्वाराने आमोरासमोर जोरदार धडक दिली&period; या धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्यावर पडला&period; त्याच्या डोक्यावर मार लागल्याने तो गंभीर झाला होता&period; त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता&comma; डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले&period;<&sol;p>&NewLine;<div>प्राथमिक माहितीनुसार&comma; आशिष गोंडाणे हा लाखनी येथे आपली खाजगी कामे आटोपून लाखनी वरून स्वगावी पालांदूरकडे त्याच्या मालकीची दुचाकी गाडी क्रमांक एम&period; एच&period; ३६ ए&period; एन&period; ५४२८ ने परतत असतांना दरम्यान वळणावर उभ्या असलेल्या मानव विकास एसटी बसला दुचाकीने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली&period; अपघातानंतर काही काळ ह्या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती&period; स्थानिकांनी पालांदूर पोलिसांना घटनेची माहिती दिली&period; काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातस्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखनी येथे पाठवला&period; आशिष गोंडाणे याच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे&period; पुढील तपास पालांदूर पोलिस करीत आहेत&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version