खापा, वार्ताहर :- वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, यात शंकाच नाही. पण, वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच महत्त्वाची बाब लक्षात घेऊन मुकेश पावडे मित्र परिवारातर्फे शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त वृक्षारोपण व संगोपन करून पर्यावरण पुरक नवरात्र साजरी करण्याचा संकल्प युवकांनी केला.
22 सप्टेंबर सोमवार पासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सव निमित्य खापा शहरात विविध भागात नऊ दिवसात 21 झाडे लावून, वृक्षारोपणासोबतच युवकांनी वृक्षसंवर्धन करण्याचा ध्यास घेतला. संवर्धनासाठी युवकांनी प्रतिज्ञा घेत वृक्षाची देखभाल पालनपोषण करेल, असा निश्चय केला. पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी वृक्षसंवर्धनासाठी मुकेश पावडे मित्र परिवार आणि युवकांनी स्तुत्य पुढाकार घेतल्याने सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान, ग्लोबल वाॅर्मिंगमुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. मानवी आक्रमणामुळे जंगलतोड वाढल्याने वन्यजीव, पशुपक्षी वातावरणाला धोका निर्माण झाला आहे. वृक्षतोड हे याचे प्रमुख कारण आहे. परिणामी, अलीकडे मानवाला याचे महत्त्व कळले असून, वृक्षारोपण करण्याकडे अधिकाधिक भर दिला जात आहे. वृक्षारोपण हे महत्त्वाचे आहेच. पण, त्यासोबत त्याचे संवर्धन ही खरी काळाची गरज आहे. वृक्षाचे संवर्धन झाले तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील. वृक्षारोपणासोबतच सर्वांनी वृक्षसंवर्धन करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता मुकेश पावडे यांनी केले.
शरद नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत नऊ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पहिल्या दिवशी शिवधाम येथे मुकेश पावडे, मनिष मारोतकार यांच्या हस्ते कडुलिंब आणि चिंच असे दोन झाड, दुसऱ्या दिवशी राघवानंद स्वामी आश्रम (मढी) येथे धीरज डोईजोड, सागर सेरेवार यांच्या हस्ते कडुलिंब आणि चिंच असे दोन झाड, तिसऱ्या दिवशी लांबटपुरा स्थित स्मशानभूमी येथे नीरज नाचणकर, आकाश प्रजापती यांच्या हस्ते वट, कवट असे दोन झाड, चौथ्या दिवशी लांबटपुरा येथे स्थित बगीच्यात अमोल लांबट, स्नेहल सुपारे यांच्या हस्ते गुलमोहरचे दोन झाड, पाचव्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथे मुख्य अतिथी ब्रिजलाल रघुवंशी कळमेश्वर, प्रज्वल नंदनवार, सचिन भैसारे यांच्या हस्ते कवट, गुलमोहर, जत्रोफा असे तिन झाड, सहाव्या दिवशी शिवधाम येथे सुमित डोंगरे, सचिन कुंभारे यांच्या हस्ते तेजपान आणि गुलमोहर असे दोन झाड, सातव्या दिवशी नवीन वस्ती येथील दलित वस्ती येथे स्थित गार्डनमध्ये यश भुसारी, लोकेश जुनघरे यांच्या हस्ते शेवगा आणि गुलमोहर असे दोन झाड, आठव्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथे चरण गजभिये, धनराज खुबाळकर यांच्या हस्ते दोन झाड जत्रोफा असे दोन झाड, नवव्या दिवशी पोलीस स्टेशन खापा येथे ठाणेदार किशोर भुजाडे, मकसूद शेख, पो. शि. विनोद पाटील, पो.शि. नितेश चिपडे यांच्या हस्ते चिंच, दोन कवट, दूधमोगरा असे चार झाड लावण्यात आले.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वृक्षारोपणचे आयोजन मुकेश पावडे, मकसूद शेख, प्रज्वल नंदनवार, सचिन भैसारे, चरण गजभिये, स्नेहल सुपारे, आकाश प्रजापती, सचिन कुंभारे, मनीष मारोतकर, नीरज नाचनकर, आकाश सेरेवार, सागर सेरेवार तसेच मुकेश पावडे मित्र परिवारातर्फे करण्यात आले.




