Home Latest News तरुणांचा आयटीआयकडे ओढा वाढला; जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तरुणांचा आयटीआयकडे ओढा वाढला; जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

<p><strong>हंसराज भंडारा &colon;-<&sol;strong> कौशल्याच्या युगात जिल्ह्यातील तरुण-तरुणींचा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील &lpar;आयटीआय&rpar; विविध अभ्यासक्रमांकडे कल लक्षणीयरीत्या वाढत असून&comma; ऑगस्ट २०२६ सत्रासाठी सुरू असलेल्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे&period; कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत सुरू असलेल्या या प्रक्रियेत जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६३९ उमेदवारांनी आपले अर्ज निश्चित केले आहेत&period; ऑनलाईन अर्ज निश्चित करण्याची अंतिम मुदत २२ जून २०२६ असून&comma; पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर&period; बी&period; गणवीर यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>भंडारा जिल्ह्यात एकूण ८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून त्यांची प्रवेश क्षमता १ हजार ५७६ आहे&period; तसेच ३३ खाजगी आयटीआय संस्थांमध्ये १ हजार ४४८ जागा उपलब्ध आहेत&period; जिल्ह्यात एकूण ३० विविध रोजगार व स्वयंरोजगारक्षम ट्रेड्स उपलब्ध असून&comma; एकूण ३ हजार २४ जागांसाठी गुणवत्तेच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिले जाणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>बदलत्या तंत्रज्ञानाची गरज ओळखून संचालनालयाने यंदापासून &OpenCurlyQuote;सोलर टेक्निशियन’ हा नवा ट्रेड सुरू केला आहे&period; अक्षय ऊर्जा क्षेत्रात वाढत्या संधी लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व आयटीआय संस्थांमध्ये समुपदेशन व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत&period; जिल्हास्तरावरील समन्वय व समस्या निवारणासाठी शासकीय आयटीआय भंडारा येथील गटनिर्देशक एम&period; एस&period; बदुकले यांची जिल्हा प्रवेश समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून&comma; त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; भंडारा आयटीआयने राज्यस्तरीय कौशल्य विकास स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी केली आहे&period; संस्थेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याभिमुख आयटीआय अभ्यासक्रमांना प्राधान्य द्यावे&period; या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून स्वतःबरोबरच जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे&comma;” असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर&period; बी&period; गणवीर यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रवेश प्रक्रियेबाबत अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version