spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

31 वा शहिद आदिवासी गोवारी श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न

तिरोडा :- 31 वा शहिद आदिवासी गोवारी श्रद्धांजली कार्यक्रम आदिवासी गोवारी समाज मुंडीकोटा द्वारे करण्यात आला होता 23 नोव्हेंबर 1994 रोजी आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या पाण्याची आहुती देणाऱ्या 114 सहित आदिवासी गोवारी बांधवांना श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम घेण्यात आला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बिरसा मुंडा व महामानवाच्या फोटो दिप प्रज्वलन करून माल्यार्पण करणण्यात आले .

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रतिमा जैतवार ग्रामपंचायत सरपंच, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव ठाकरे , दीपप्रज्वलन देवेंद्र मंडपे विशेष अतिथी बळीराम राऊत प्रमुख मार्गदर्शक मंगेश सारे भाऊराव शेंद्रे जगदीश नेवारे दादर कुसराम अशोक वाघाळे अजय चौधरी भूमेश्वर सोनवणे रवींद्र फुन्ने ,प्रवीण राऊत, अशोक शहारे प्रकाश फुन्ने व गावातील प्रतिष्ठित नागरिक सह आदिवासी गोवारी समाज यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांनी आदिवासी गोवारी समाज यावर आपले मार्गदर्शन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.