spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दांडेगाव येथे संविधान दिनानिमित्त भीमगीतांची प्रबोधनात्मक कव्वाली

– संविधान रक्षणासाठी सर्वच समाजातील युवकांनी पुढे यावे – जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे.

 गोंदिया :- जेतवन बहुद्देशीय संस्था आणि बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त दांडेगाव येथे प्रबोधनात्मक भीमगीतांची कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास विशेष उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तसेच संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात बोलताना बोपचे यांनी संविधान दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून संपूर्ण बहुजन समाजाने सामाजिक बांधिलकी म्हणून साजरी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. संविधानातील समानतेच्या मूल्यांना आजच्या काळात अधिक व्यापकपणे अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

देशातील सद्यस्थितीचा उल्लेख करत संविधानाची पायमल्ली होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. लोकशाही बळकट ठेवण्यासाठी युवकांनी पुढे येऊन संविधान रक्षणाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेणे अत्यावश्यक असल्याचे मार्गदर्शन केले.

देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावरील मुख्य न्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला. या गंभीर घटनेची योग्य नोंदही न झाल्याने न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बोपचे यांनी मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे, माजी आमदार हेमंत पटले, जिल्हा परिषद सदस्य अश्विनी पटले, पंचायत समिती सदस्य अजाबराव रिनायत, सरपंच . पंकज अंबुले, माजी जिल्हा परिषद सदस्य बिसन, भंडारकर, कैलास गौतम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तरुण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.