– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. मंगळवार (ता. १०) शोध पथकाने ६७ प्रकरणांची नोंद करून ४५,३००रुपयाचा दंड वसूल केला.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. ४०० दंड) या अंतर्गत २९ प्रकरणांची नोंद करून ११,६०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. ४०० दंड) या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून ४०० रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ८ प्रकरणांची नोंद करून ६५०० रुपयांची वसुली करण्यात आली.

हॉटेल मध्ये डिसेलटींग चेम्बर नसल्याने, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे, कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत ३ प्रकरणाची नोंद करुन १५००० रुपयाची वसुली करण्यात आली. शासकीय भूमिगत नाली वरील चेंबर मध्ये डेब्रिज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे तसेच इतर चेंबर क्षतिग्रस्त करणे या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करुन ५००० रुपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास २४ प्रकरणांची नोंद करून ४८०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.पूजा अपार्टमेंट यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रु.१०,००० चा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत मेसर्स सॉल्ट ऑल डे ब्रू, मे. रॉ अँड वाईन रेस्टॉरंट आणि मे. न्यू ओम पकोडेवाला यांनी रस्त्यालगत अस्वच्छता पसरविणे अंतर्गत प्रत्येकी ५००० प्रमाणे एकूण रु. १५००० चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. मेसर्स सुदर्शन आर एल इन्फ्रास्ट्रक्चर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रु. १०००० चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत श्री देव साहू यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५००० दंड वसूल करण्यात आले. नेहरू नगर झोन अंतर्गत मे. शिव फरसाण यांनी हॉटेलचे डेब्रिज नालीमध्ये टाकून नाली बंद केल्याबद्दल रू. ५००० दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. मे. साईनाथ गोड भांडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.५००० दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. येवले स्वीट्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५००० दंड वसूल करण्यात आले. आशीनगर झोन अंतर्गत मे. मेसर्स मॅजेस्टिक यांनी विद्युत खांबांवर विनापरवाना फलक लावल्याप्रकरणी रु. ५००० दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने १० प्रकरणांची नोंद करून रू. ६०००० दंड वसुल केला.




