spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्थागुअ नागपुर ग्रामिण पोलिसांची मोठी कामगिरी, घरफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश

– तीन आरोपी अटकेत, १२ लाख ८९ हजार रू. चा मुद्देमाल जप्त

कन्हान :- पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामिण पोलिसांनी मोठी कामगिरी करत घरफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश केला असुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडुन सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकुण १२ लाख ८९ हजार १३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मंगळवार (दि.१०) फेब्रुवारी २०२६ ला कन्हान पोलीस ठाणे अप.क्र. ९४/२०२६ कलम ३३१(३), ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) बीएनएस अन्वये दाखल गुन्ह्या च्या तपासा दरम्यान बातमीदाराकडुन मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बादल संजय संतापे वय २६ वर्ष रा. रमा नगर, कामठी यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने (दि.६ )फेब्रुवारी २०२६ ला कांद्री परिसरात मित्रांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने शेख जाफर शेख मुजफ्फर वय ४० वर्ष, रा. कामगार नगर कामठी व नवीन मिलिंद बारसे वय २५ वर्ष, रा. येरखेडा कामठी यांच्यासह मिळून कन्हान, काटोल, कळमेश्वर, केळवद, कोंढाळी व बुटीबोरी पोलीस ठाणे हद्दीत सलग घर फोड्या केल्याची कबुली दिली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार कन्हान पोस्टे चे अप.क्र.९४/२६, ८६३/२५, ७५८/२५, ६५४/२५, ४५९/२६, काटोल पोलीस ठाण्याचे ८५/२६ व ९७१/ २५, कळमेश्वर ८७/२५, बुटीबोरी ६७४/२५, केळवद ६०२/२५ व ७५२/२५ असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपींकडुन गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी क्र एमएच ४० सी क्यु ५३९७, विविध सोने-चांदीचे दागिने ७५५०० रू रोख रक्कम तसेच घरफोडी साठी वापर ण्यात आलेली लोखंडी रॉड असा एकुण १२ लाख ८९ हजार १३६ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल व कागदपत्रांसह तीनही आरोपीं ना पुढील तपास व कारवाईसाठी कन्हान पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के व स्था निक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, विजय चनोर तसेच प्रमोद भोयर, शैलेश यादव, संजय बरोदिया, अभिषेक देशमुख, संजय बांते, राहुल पाटील व आशुतोष लांजेवार यांनी यशस्विरित्या पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.