सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 68 प्रकरणांची नोंद

0
67

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरूवार (ता.16) रोजी शोध पथकाने 68 प्रकरणांची नोंद करून 36,300 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10,800 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रू.200 चे दंड वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4प्रकरणांची नोंद करून रू.1,600 चे दंड वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 6,500 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकाने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 4,000 रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 3,200 रुपयांची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून रु. 4,000 चे दंड वसूल करण्यात आलेला आहे.सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका कचरा जाळून उपद्रव निर्माण केल्यामुळे 1 प्रकरणाची नोंद करून रू.5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे.श्रीनाथ क्रिएशन यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रु.१०,००० दंड वसूल करण्यात आले. तसेच मे.दीवा एक्झीबिशन यांनी सी अँड डी साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रू.5,000 दंड वसुल करण्यात आले.जितेंद्र कनमनी यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू. 5,000/-दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत आशिष किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. ५,०००/- चे दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. भगवान भरोसे भोजनालय यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. ५,०००/- चे दंड वसूल करण्यात आले.आसीनगर झोन अंतर्गत मे. ब्लॉसम स्कुल यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याने रु.१०,००० दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने ६ प्रकरणांची नोंद करून रू. ४०,००० दंड वसूल केला.