spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शासकीय निरीक्षणगृह बालगृह मुलांचे नवीन इमारतीत स्थलांतर

यवतमाळ :- महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, पुणे अंतर्गत कार्यरत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यवतमाळ यांच्या शासकीय निरीक्षण गृह व बालगृह (मुलांचे), यवतमाळ यांचे कार्यालय नवीन प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे.

यवतमाळ शहराच्या मध्यवर्ती भागात, बस स्टँड चौकापासून केवळ २०० मीटर अंतरावर, जिल्हा परिषद क्वार्टर मार्ग, पोलीस कवायत मैदान रोड, पळसवाडी येथे ही नवीन इमारत वसलेली असून, नागरिकांसाठी अतिशय सोयीचे ठिकाण ठरते आहे.

बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत ६ ते १८ वयोगटातील विधी संघर्षग्रस्त व संरक्षणाच्या गरज असलेल्या बालकांसाठी येथे विविध सेवा पुरविल्या जातील. त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सेवा, औपचारिक व व्यावसायिक शिक्षण, समुपदेशन यांचा समावेश आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधीक्षक गजानन जुमळे यांच्या संकल्पनेतून, बालकांसाठी खेळ, शिक्षण व संस्कार यांचा समतोल राखणारे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. इमारतीमध्ये पक्षी, प्राणी, निसर्गचित्रे, प्रेरणादायी विचार, संस्कारपर भित्तीचित्रे व आकर्षक रंगरंगोटी यांचा वापर करून बालस्नेही, आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार करण्यात आले आहे.

१५ ऑक्टोबर २०२५ पासून नवीन इमारतीतून कार्यालयीन व्यवहार सुरू झाले असून, बाल न्याय व्यवस्थेशी संबंधित सर्व यंत्रणांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन अधीक्षक गजानन जुमळे यांनी कळविले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.