– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.मंगळवार(ता.23) शोध पथकाने 94 प्रकरणांची नोंद करून 57,400 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 37 प्रकरणांची नोंद करून 14,800 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून 2,800 रूपयांची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था,कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली.मॉल,उपहारगृहे,लॉजिंग च बोर्डिंगचे हॉटेल सिनेमाहॉल मंगलकार्यालये,कॅटरर्स सर्विस प्रोव्हायडर इत्यादींनी या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 15 प्रकरणांची नोंद करून 22,000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/ जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 29 प्रकरणांची नोंद करून 5,800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने हनुमाननगर झोन अंतर्गत मे. अनंता इंफ्रास्ट्रक्चर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले.धंतोली झोन अंतर्गत मे.आदियोग एनक्लेव्ह यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. नागपूर जिल्हा पत संस्था यांनी बोरवेलचे काम करतांना चेंबर ब्लॉक केल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. राहुल बांधेबुचे यांनी रस्त्यालगत दुकानाचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. जयश्री किराणा शॉप यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले.सतरंजीपुरा झोन अंतर्गत हरिश रूपचंद निमजे यांनी रस्त्यालगत अनधिकृतरित्या पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन घेण्याकरिता चेंबर खणल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत मे.एचडीएफसी बँक यांनी रस्त्यालगत बँकेचा कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे.वाधवानी ब्लिस यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू.50,000 दंड वसुल केला.








