तिरोडा :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसापासून संपूर्ण देशात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावोगावी सेवा पंधरवाडा 17 ते 2 ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आला होता. या सेवा पंधरवड्यात अर्जुनी येथे आयुर्वेदिक दवाखान्यात राष्ट्रीय आयुष्य अभियान आरोग्य सेवा कुटुंबकल्याण संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विमानाने महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला या शिबिरात महिलांना आयुर्वेदिक औषधी वनस्पती याबद्दल माहिती देण्यात आली यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती आपल्या गावात घरातच असते पण याची जाणीव नसल्यामुळे आपण औषधी उपचारापासून वंचित राहतो व आपण दुसऱ्या इंग्रजी ऍलोपॅथी द्वारे वाढतो यामध्ये अंमल की अश्वगंधा बोला ब्राह्मणी गुड्डूची हरिंद्रा कुमारी मंडूकपर्णी निंब निरगुडी पुनर्वा शतावरी शिगृ जुंगी तुळस आडुळसा यासारख्या वनस्पती आपल्या सभोवताली असतात त्याचा आपण उपयोग प्रत्येक महिलांनी व नागरिकांनी केला पाहिजे असे मार्गदर्शन शिबिरात उपस्थित सर्वच मान्यवरांनी केले ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य हुपराज जमयवार हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर चेतलाल भगत पंचायत समिती सदस्य प्रमुख पाहुणे सरपंच सुनीता अंगझाले ,शालू पटले ,मेघा चव्हाण, डॉ. आदित्य दुबे, डॉ.शिवकुमार हरिणखेडे डॉक्टर मुक्ता आदित्य व परिचारिका, आशा सेविका ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कार्तिक पटले व आभार परिचारिका पटले यांनी केले.



