spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मांग गारोडी समाजाचे युवा नेतृत्व शिवसेनेत दाखल, विक्की नाडे व सहकाऱ्यांचा भव्य पक्ष प्रवेश

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य सोहळा

– यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी भक्कम

यवतमाळ :– येथील उत्सव मंगल कार्यालयात शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते भव्य पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या वेळी ना. संजय राठोड यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यास माजी आमदार व जिल्हा निरीक्षक ज्ञानेश्वर धाणे पाटील, पश्चिम विदर्भ समन्वयक परागभाऊ पिंगळे, जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार व श्रीधरकाका मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार व गजानन डोमाळे, युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल गणात्रा, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली मासाळ तसेच उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मांग गारोडी समाजाचे नेतृत्व तथा शिवसेना शहर उपाध्यक्ष सतीश सकट यांच्या मार्गदर्शनाखाली नेताजी नगरातील युवा कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.

यामध्ये विकी नाडे, दिलीप सकट, सतीश हातागळे, दूषण हातागळे, राजू हातागळे, आकाश हातागळे, छोटू उर्फ देवहर्ष मसराम, मानव नाडे, जीवन नाडे, मांगीलाल खिची, लोचन हिवराडे, सनी नाडे, कुणाल राखपसरे, अनिल हातागळे, राहुल हातागळे, महेंद्र नाडे, अजय सकट, दीपक हातागळे, सावन हातागळे व बादल नाडे यांचा समावेश आहे.

या पक्ष प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून पक्षाचे कार्यक्षेत्र विस्ताराला नवी चालना मिळाली आहे.

Popular Articles