spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आसमान फाउंडेशन तर्फे टिळक विद्यालयात कन्या पूजन

नागपूर :- आसमान फाउंडेशन नागपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही लहान मुलींसोबत नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी टिळक प्राथमिक विद्यालय धंतोली येथील गरीब व आर्थिक रूपाने दुर्बल नऊ मुलींचे पूजन केले गेले तसेच पन्नास मुलींना शालेय साहित्य वितरित करण्यात आले. आपल्या उदबोधनात डॉ. रवि गि-हे यांनी आसमान फाउंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सव शस्त्र म्हणून वही पुस्तक व पेन यांचा वापर करून नरकासुर रुपी अज्ञानाचा अंत केला पाहिजे. कार्यक्रमात फाउंडेशनच्या महिला सदस्य विभा विंचुरकर, मेघा गि-हे, उषा जैन, जयश्री बोबडे यांनी नऊ कन्यांचे पूजन केले. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवि गिऱ्हे, सचिव नरेश शेंडे, ज्योतिषाचार्य नरेंद्र विंचुरकर, दिनेश टेकाडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा संचालक अध्यक्ष स्वानंद सोनी, योगेश्वर बुटी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभारे, प्राचार्या सपना कुरलकर, दर्शना देशपांडे यांचे सहकार्य लाभले.

Popular Articles