नागपूर :- मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून नागपूर महानगरपालिका आणि मनपा ज्येष्ठ नागरिक कक्ष संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात साजरा केला जाणार आहे. कार्यक्रमात ‘बाकी शून्य’ या दोन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
“जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात ज्येष्ठ नागरिक व कुटूंबातील सदस्यांकरिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. कार्यकमात मान्यवरांच्या हस्ते मनपाच्या विविध उपक्रमात सक्रीय सहभाग घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते होईल. तर प्रमुख अतिथी म्हणून मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. अतिरिक्त आयुक्त विजया बनकर, यांच्या सह समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी साधना सयाम यांच्यासह इतर अधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहतील.








