मुंबई :- विजयादशमी निमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी शस्त्र पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ आणि प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन तसेच शस्त्र पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, ज्येष्ठ नेते राज पुरोहित, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, सह सचिव भरत राऊत, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.








