spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राजधानीत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन

नवी दिल्ली :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमास व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी व्यवस्थापक महाराष्ट्र सदन प्रमोद कोलपते यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा आणि ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेद्वारे देशसेवेतील कार्याचा परिचय सर्वांना करून दिला.

Popular Articles