spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामपंचायत कार्यालय गांगणेर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी 

किशोर साहू, मौदा, ता.४ :- गुरुवार दिनांक 2 ऑक्टोंबर ला ग्रामपंचायत कार्यालय गांगणेर येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती त्यांच्या फोटोला माल्यार्पण करुन व पूजाअर्चना करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी सरपंच अनिता श्रीधर चिंचुलकर, उपसरपंच मोतीराम घरजाळे, ग्रामपंचायत अधिकारी विनोद वरुडकर, ग्रामपंचायत सदस्यगण उषा मेश्राम, अंगणवाडी सेविका पुष्पकला राऊत, आशा वर्कर सुषमा अलोने, ग्रामपंचायत कर्मचारीवृंद कवडू खंडाळे, शंकर खंडाळे , सर्वच वृत्तपत्राचे एजंट व पत्रकार किशोर साहू सह इतर ग्रामपंचायत सदस्यगण व ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular Articles