spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बंजारा,धनगर आणि गोवारी यांच्या सह इतर जातींची आदिवासी समाजात होणारी घुसखोरी थांबविण्यासाठी गोंदियात हजारो आदिवासी बांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यल्यावर

गोंदिया :- आदिवासी समाजात इतर जातींची होणारी घुसखोरी पाहता संपूर्ण राज्यासह आज गोंदियात देखील आदिवासी समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले असून 30 हजाराच्या वर आदिवासी बांधवानी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

गेल्या काही वर्षा पासून बंजारा, धनगर आणि गोवारी समाज आम्हाला देखील आदिवासीचा दर्जा द्या या मागणी साठी आंदोलन करताना दिसत असून या जातींच्या लोकांमुळे खरा आदिवासी समाज आपल्या हक्का पासून वंचित राहिल याचा बाबीचा विरोध करण्यासाठी एकवटले आहेत आमची संस्कृती वेगळी आहे तसेच बंजारा, धनगर आणि गोवारी समाजाची संस्कृती वेगळी आहे ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयतन करीत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावर उतरांना दिसत असून या मोर्च्याला गोंदिया जिल्याच्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम खासदार प्रशांत पडोळे, माजी आमदार सहसराम कोरोटे यांच्या सह गैर आदिवासी समाजाच्या नेत्यांनी देखिल आजच्या आदिवासी जन आक्रोश मोर्च्याला पाठींबा दिला होता.

Popular Articles