– 2021 मध्ये निलंबित – तरीही सुधारेना
कुही :- तालुक्यातील मौजा विरखंडी येथील मनोहर लोखंडे यांच्याकडे अनेक वर्षापासून रास्त भाव दुकान आहे 2021 साली अनेक तक्रारीमुळे दुकान निलंबित झाले होते, तरीही दुकानदार काही सुधारणा असा झालाय.
जुलै मध्ये तालुका निरीक्षक अधिकाऱ्याने निरीक्षण केले असता गंभीर तफावती धान्यामध्ये व नियमाने आढळून आल्या होत्या. त्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारणे द्या नोटीस बजावली गेली व त्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते की आपल्याला निलंबित किंवा प्रधिकार प्रमाणपत्र ( लायसन्स ) रद्द का करू नये असे स्पष्ट शब्दात नोटीस बजावली होते, एवढं होऊन सुद्धा दुकानदार दुकानदारावर कारवाई का झाली नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण मागील प्रकरणात 2021 मध्ये याच प्रकारच्या नोटीसीवर दुकान निलंबित झाले होते पण आता तक्रार करूनही कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. तहसील कार्यालयात सेटिंग झाली आहे. अशी जोरदार चर्चा तालुक्यात व गावात मोठ्या प्रमाणात होत आहे. व राशन दुकानावर कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेल आहे. दुकानदारावर लवकरात लवकर कारवाई करा नाहीतर आम्ही आंदोलनात उतरू असा तक्रारदारांनी इशारा दिला आहे.
राशन दुकानदार देतो बड्या नेत्यांच्या धमक्या.
एक नाही तर दोन ते तीन वेळा चुका होऊनही राशन दुकानदार तक्रार कर्त्यांना आमदाराची धमकी देतो कि, “मी काँग्रेस पक्षाचा आहे, आमदार माझा आहे, मंत्रालयात माझी सेटिंग आहे, तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही, बघून घेईन तुम्हाला” अशा प्रकारच्या धमक्या देतो तरीही कारवाई का झाली नाही का होत नाही असे तक्रारकरत्यांचे व धान्य पिढीत लोकांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया
1) 2021 मध्ये ही माझ्या आंदोलनामुळे या दुकानदाराचे दुकान निलंबित झाले होते त्यावेळी आम्ही लायसन्स रद्द व्हावे म्हणून सुद्धा पुढे जाणार होतो पण दुकानदार सुधरेल या आशेवर माघार घेतली होती पण आता चक्क दुकानदार आमदाराची व मंत्रालयाची व बघून घेण्याची धमकी देतो, मला तहसील कार्यालयात सेटिंग झाल्याची चर्चा कानी आली आहे पण आम्ही शांत बसणार नाही वेळप्रसंगी अन्नासाठी अन्नत्याग आंदोलन करू.
अनिश लोखंडे, उपसरपंच विरखंडी


2) मनोहर लोखंडे यांनी मला माझ्या घरी येऊन धमकी दिली की तू माझ्याविरुद्ध प्रतिक्रिया का दिली अशा मुजोर दुकानाविरुद्ध लवकरात लवकर कारवाई व्हावी नाहीतर तो दिवस दूर राहील की गरिबांच्या अन्नासाठी अन्नत्याग आंदोलन करू.
कवडुजी चापले, माजी सरपंच ग्रामपंचायत विरखंडी








