spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

यवतमाळ :- मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार व नागेश वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन’ निमित्त, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता, मातोश्री वृद्धाश्रम, निळोणा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दीपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), यवतमाळ हे उपस्थित होते. हितेश सेठ, उपाध्यक्ष, व प्रविण बंडेवार, सचिव, मातोश्री वृद्धाश्रम, निळोणा हे सुद्धा मान्यवर पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक राजेश कोडापे, पॅनल वकील, यवतमाळ यांनी “Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act, 2007” या कायद्यावर सविस्तर माहिती दिली. या कायद्याच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक, सामाजिक व वैयक्तिक सुरक्षेसाठी त्यांच्या मुलांकडून किंवा वारसांकडून कायदेशीर जबाबदारीने देखभाल मिळावी, यावर भर दिला आहे. त्यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत गरजांमध्ये निवास, अन्न, औषधोपचार यांचा समावेश होतो आणि यासाठी जर नातेवाईकांनी जबाबदारी न घेतल्यास, ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे अर्ज करू शकतात.

दीपक दाभाडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजात बदलत्या काळानुसार ज्येष्ठांनीही आपल्या विचारांमध्ये लवचिकता ठेवावी असे सांगितले. त्यांनी सांगितले की, वृद्धांचे हक्क सुरक्षित राहावेत यासाठी ज्येष्ठ नागरिक भवन, यवतमाळ येथे विधी सहायता केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील त्यांनी उपस्थितांना दिली. तसेच, आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठविणे टाळावे, कारण त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन व घडवणूक कष्टपूर्वक केली आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार बांन्ते, पॅरा विधी स्वयंसेवक, यवतमाळ यांनी केले.. प्रविण बंडेवार यांनी वृध्दाश्रमात सुरू असलेल्या अन्नपूर्णा योजना आणि परिसरातील लोकांसाठी सुरू केलेल्या धर्मार्थ दवाखान्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांनी वृध्दाश्रमाला कोणतीही शासकीय मदत न घेता चालविल्याचे सांगून उपस्थितांचे आभार मानले.

Popular Articles