spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हलबा विकास युवा मंडळाच्या वतीने कोजागिरी व कौटुंबिक सोहळा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

– समाज बांधवातील बाल कलाकारांनी विनोदी व नृत्य गीताचे केले सादरीकरण

– यवतमाळ चे प्रसिद्ध कवी जयंत चावरे केले शब्दांनी मंत्रमुध

यवतमाळ :- हलबा विकास युवा मंडळ यवतमाळ यांच्यावतीने कोजागिरी व कौटुंबिक सोहळा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळ शहरातील प्रजापती नगर येथील गणपती मंदिरात 11 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदीप चांदेकर, प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर, मोरेश्वर लिखार, राजेंद्र पराते,अमरावतीचे सामाजिक कार्यकर्ते देवानंद हेडाऊ, सुरेश कायरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

यवतमाळ शहरात हलबा बांधव मोठ्या संख्येने वास्तव करीत आहे अशातच समाजातील कौटुंबिक सलोखा वाढावा व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना वाव मिळावी या हेतून यवतमाळ हलबा विकास युवा मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास सर्वप्रथम हलबा विकास युवा मंडळ तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल निमजे यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यामध्ये प्रत्युषा पत्रे, ऋत्वी पराते, अवनी लिखार, किंजल लिखार, अन्वीर्थ धकाते, हिमांशू पराते, यांनी सहभाग घेऊन आपले नृत्य सादर केले. सोबतच ज्योती उमरेडकर, योगेश निमजे, अनिल निमजे, शरदराव वरुडकर यांनी गीत सादर केले.

यानंतर १०वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यवतमाळ चे प्रसिद्ध कवी जयंत चावरे यांचा ‘आसु आणि हसू’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कवी प्रा. जयंत चावरे यांच्या विनोदी आणि सामाजिक कवितारुपी शब्दांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी त्यांना उत्तम दाद दिली.

जेवणासोबतच दुग्धप्राशनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संचालन संदीप पत्रे व अभिजीत धकाते यांनी केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन मनस्वी पराते व अन्वित पत्रे यांनी केले. तर आभार संजय पराते यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर पराते, रितेश उमरेडकर, सुशांत पराते, वसंत नेवाळे, अविनाश बोकडे,  स्मिता पराते, किरण पत्रे, कांचन पराते, शिल्पा लिखार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाकरिता विशेषत्वाने कैलास पराते, प्रवीण नंदनवार, अनिल लिखार यांचे मार्गदर्शन लाभले.

Popular Articles