राज्यमंत्री इंद्रनील नाईक आता गोंदियाचे पालकमंत्री

0
177

यवतमाळ :- उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 17 ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यानुसार प्रशासकीय कारणास्तव पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.

राज्यमंत्री नाईक यांच्याकडे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण आदी खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. नवीन निर्णयानुसार त्यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी मंत्री बाबासाहेब मोहनराव पाटील हे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते.

सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ. रा. रेडेकर यांच्या स्वाक्षरीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.