नागपुर ०९ : सराईत आरोपी नामे सतिष कृष्णराव गायधने, वय ५१ वर्षे, रा. प्लॉट क ३, फ्लॅट कं १००, अनमोल नगर, वाठोडा रिंग रोड, नागपुर याचेविरूध्द अवैध रेती चोरीचे १० गुन्हे नोंद असुन त्यापैकी ०९ गुन्हे अरोली पोलीस स्टेशन येथे नोंद आहे. तो सदर गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. असे गुन्हे करून तो शासनाचा महसुल बुडवतो तसेच आरोपीच्या कृत्यु मुळे पर्यावरणाचे सुध्दा नुकसान होते. नागपुर ग्रामीण पोलीसांनी त्याचेविरूध्द वेळोवेळी कारवाई करून गुन्हे नोंद केले व त्याला अटक केले आहे. तसेच आरोपी नामे सतिष कृष्णराव गायधने याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपी याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली. आरोपीचे कृत्य समाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अरोली पोलीसांकडुन एम.पी.डी.ए. कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. दिनांक ०७/०७/२०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी, नागपुर यांनी सराईत गुन्हेगार सतिष कृष्णराव गायधने याचे विरूध्द स्थानबध्दतेता आदेश काढला असता अरोली पोलीसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेवुन त्याला मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे दाखल केले.
अवैधरित्या रेती चोरी आणि वाहतुक करणारा सराईत गुन्हेगार सतिष कृष्णराव गायधने याला एम.पी.डी.ए कायदया अंतर्गत केले स्थानबध्द









