spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एच.एस.महात्मे संस्कार विहार स्कूल, रमानगरचा खासदार सांस्कृतिक महोत्सवात गीतगायनात सहभाग

नागपूर :- खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 ह्या कार्यक्रमात 52,735 विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतगायनाच्या माध्यमातून आज इतिहास रचला आहे. या उल्लेखनीय उपक्रमा मुळे एशिया वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ इंडिया या दोन्ही विक्रमांमध्ये नाव नोंदविण्याचा सन्मान एच.एस.महात्मे संस्कार विहार रमानगर ह्या शाळेच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झाला आहे. या भव्य आणि यशस्वी उपक्रमाचा भाग होण्याचे भाग्य आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लाभले त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

ही अनुभूती आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि अभिमानास्पद क्षण ठरली आहे.सर्व पालकांनी जे सहकार्य केले त्याबद्दल संपूर्ण महात्मे टीम कडून खुप खुप धन्यवाद आपले सहकार्य असेच पुढेही मिळेल अशी आशा करते. आपल्या संस्कारांचा, एकतेचा आणि देशप्रेमाचा संगम या उपक्रमातून झळकला आणि हेच आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. संपूर्ण खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती आणि गीता परिवार यांचे खुप खुप धन्यवाद दिले.

Popular Articles