spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गडचांदूर येथे दोन किलो गांजा सह दोन युवक अटकेत

चंद्रपूर :- गडचांदूर येथें मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरझडी शेतशिवारात कारवाई करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत २ किलो ११ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ईरफान सय्यद इस्माईल (रा. लक्ष्मी टॉकीजजवळ, गडचांदूर) आणि अनिल जगेराव आडे (रा. बैलमपुर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांना ईरफान सय्यद इस्माईल आणि अनिल जगेराव आडे हे दोघे वरझडी शेताजवळ अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी कदम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ठिकाणी सापळा रचला. रोडलगत छुप्या पद्धतीने थांबून पथकाने परिसराची पाहणी केली असता झाडाखाली दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत दिसून आले. चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने पंचासमक्ष परिसराची तपासणी करण्यात आली.तपासात झाडाखाली पोपटी रंगाचे एक गाठोडे आढळले. त्यातील हिरवट रंगाची पाने, फुले व बोंडांवरून तो गांजासारखा पदार्थ असल्याची शंका बळावली. पंचांनीसुद्धा त्याचा वास घेतल्यावर तो गांजा असल्याची खात्री झाली. वजन केल्यावर त्याचे एकूण वजन २ किलो ११ ग्रॅम निघाले. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर अंमली पदार्थ नियंत्रण अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Popular Articles