spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलिस असल्याचे भासवून धान्य व्यापाऱ्यांचा माल लुटले, खापा पोलिसांची दबंग कारवाई, चार तासांत पोलिसांनी आरोपींना अटक केली

खापा :- मध्यप्रदेश येथून रायपूरला विक्रीकरिता धान्य व लाखेचा माल घेऊन जाणाऱ्या मालवाहक वाहनाला अडवून, पोलिस म्हणून भासवून लुटपाट करणाऱ्या सात आरोपींना खापा पोलिसांनी अवघ्या चार ते पाच तासांत मालासह ताब्यात घेतले. आरोपीं पैकी एक व्यापाऱ्याच्या वाहनाचा चालक असल्याचे निष्पन्न झाले, ज्याने आरोपींना माहिती देऊन मदत केली.

तक्रारदार अंबर हरिप्रसाद साहू, वय २३ वर्ष, सावरी बजार, तह. मोहखेड, जि. छिंदवाडा मध्यप्रदेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये आकाश बोकडे, सूरज बोकडे, आशिष शर्मा, जितेंद्र लंबाटे, बादल बोकडे, हनीफ शेख सर्व आरोपी नागपूरच्या कळमना येथील रहिवासी आहेत. आणि व्यापाऱ्याचा चालक आकाश हिरालाल पठारे याचा आरोपींमध्ये समावेश आहे, हा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील रहिवासी आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर सोमवारला रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास, खापा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी पंजाबराव ता. सावनेर जवळील पुलावर एका कारमध्ये बसलेल्या चार जणांनी थंडीचे कपडे घातले होते आणि व्यापाऱ्यांच्या महिंद्रा पिकअप क्रमांक एम. पी. २८ झेड. जे. ७१६९ ला अडवले. आरोपींनी पोलिस असल्याचे भासवून या नकली पोलिसांनी व्यापारी अंबर साहू यांचा पार्टनर प्रशांत शर्मा व वाहन चालक आकाश पठारे हे दोघे माल घेऊन रायपूरला जात होते. त्यांना आरोपींनी जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. त्यांनी धान्य आणि लाखाच्या पोत्या भरलेल्या व्यापाऱ्यांच्या गाडीला ताब्यात घेतले आणि सावनेरकडे निघाले. आरोपींची पिकअप वाहन कोदेगावजवळ उभी करून आरोपींनी व्यापाऱ्यांचा संपूर्ण माल त्यांच्या गाडीत भरला आणि पळून गेले. सत्य समजल्यानंतर, व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण माहिती दिली.

मंगळावरला १८ नोव्हेंबर ला सकाळी पोलिसांनी प्रथम व्यापाऱ्यांचा चालक आकाशला बोलावले, ज्याने वारंवार त्याचे जाब बदलले आणि आकाशने सत्य कबूल केले. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत, रात्री नागपूरला निघाले आणि उर्वरित आरोपींना चोरीच्या मालासह पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यापाऱ्यांनी लाखोंचा माल जप्त केला. आरोपींना चार ते पाच तासांत अटक करण्यात आली. या तत्पर धडक कारवाईमुळे परिसरातील चोरट्यांचे आणि अवैध धंदे करण्याचे धाबे दणाणलेले आहे. बोलेरो पिक अप, टाटा एस, चारचाकी कार असे तीन वाहन अंदाजे दहा लाख पन्नास हजार, फिर्यादी कडून हिसकावलेले नगदी रक्कम तीन हजार, माल पाच लाख असा पंधरा लाख त्रेपन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात ठाण्याचे ठाणेदार किशोर भुजाडे, पी. एस. आय. जगदीश पालीवाल, नारायण बोरकर, पोलिस शिपाई परवेज शेख, राहुल रेवतकर, विशाल महालकर, चालक संदीप पाचपिल्ले यांनी केली.

Popular Articles