नागपूर :- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 दि.01/07/2025 या अर्हता दिनांकावर आधारीत संबंधीत विधानसभा मतदार यादीचे विभाजन करून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली असून नागरीकांच्या माहितीकरीता दि.20/11/2025 रोजी नागपूर मनपा क्षेत्रिय झोन कार्यालय व नागपूर महानगरपालिकेच्या www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
मतदार यादीतील नाव शोधण्याकरिता Search Engine मा. राज्य निवडणूक आयोगाने mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर (Website) उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या संकेतस्थळावर भेट देवून नागरीक आपले नाव कोणत्या प्रभागात आहे, याची माहिती घेवू शकतात.
मा. राज्य निवडणूक आयोग यांचे पत्र क्र.रानिआ/मनपा-2025/प्र.क्र.41/का-5 दि.26/11/2025 अन्वये नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 करिता मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम दिला असून या सुधारीत कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करण्याचा अंतिम दि.03/12/2025 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. करिता प्रारूप मदार यादीच्या बाबतीत हरकती व सुचना असल्यास सर्व संबंधीतांनी बुधवार दिनांक 03/12/2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत संबंधीत झोनचे सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालयात लेखी स्वरूपात आवश्यक पुराव्यासह सादर करावे.








