खापा :- शादाब एज्युकेशन सोसायटी, नागपूर द्वारा संचालित हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय, ताजाबाद शरीफ, उमरेड रोड, नागपूर येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी समवेत नागपूर बुक महोत्सवाला शैक्षणिक उद्देशाने भेट देण्यात आली. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढवणे, पुस्तकांच्या विविध प्रकारांची ओळख करून देणे. तसेच साहित्य क्षेत्रातील नव्या प्रवाहांचा परिचय करून देणे हा होता. महोत्सवाच्या भेटी दरम्यान विद्यार्थी विविध प्रकाशन संस्थाच्या स्टॉलना भेट देऊन कथा, कादंबऱ्या, माहीतीपर साहीत्य, विज्ञान, इतिहास, स्पर्धा परीक्षा, तसेच बालसाहित्य संबंधी अनेक पुस्तके पाहिली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करून वाचन संस्कृती बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.

महोत्सवात आयोजित विविध साहित्यिक कार्यक्रम लेखकांशी तसेच महोत्सवाचे संयोजक डॉ. समय बनसोड व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर यांची झालेली थेट भेट, कार्यशाळा आणि चर्चा सत्रां मुळे विद्यार्थाना साहित्य विश्वाचा समृद्ध अनुभव घेता आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग दिसुन आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. शकील, अ. सत्तार, डॉ. वीरेंद्र आदमने, डॉ. सुभाष धोटे, डॉ. सुरेश काळे, डॉ. मीनाक्षी इंगळे, डॉ. विनोद शेंडे, डॉ. सुनिल अखंडे, प्रा. अर्पित थूल, प्रा. रेणूति वारी, डॉ. सतीश बोबडे, प्रा. राजश्री मेश्राम, प्रा. उपेंद्र गुप्ता, नंदलाल शर्मा, शादाब खान, कुमेश बिहार, प्रमोद झोडे, मार्तंड गोंडाने, नियाज़ अली, प्रकाश मेश्राम, गणेश राजपूत, व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.








