– दोन डिसेंबरला होणार मतदान तर तिन ला मतमोजणी
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- रामटेक नगरपरिषद निवडणुकीच्या काही तास उरले असताना, प्रचाराला वेग आला आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चुरस वाढली असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी, प्रचाराच्या तोफा आज, सोमवारी रात्री १० थंडावणार आहेत. त्यानंतर गुप्त बैठका, राजकीय डावपेच रंगतील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या १० दिवसांपासून सभा, पदयात्रा, घोषणाबाजी आणि आश्वासनाची खैरात, सोडलेले शाब्दिक बाण, आरोप -प्रत्यारोपाने प्रभागाचा प्रचार शिंगेला पोहोचला आहे. एकमेकांविरोधात धडाडणार्या डिजिटल प्रचाराच्या तोफा थंडावल्या जाईल. या प्रचारयुद्धास अखेर पूर्णविराम मिळणार आहे. मात्र, छुप्या पद्धतीने प्रचार सुरू झाला आहे. नगरपरिषद साठी मंगळवार (दि.०२ ) डिसेंबरला मतदान होणार आहे. तर (दि. ०३) डिसेंबरला मतमोजनी आहे. त्याबाबत उमेदवारांमध्ये उत्कंठा वाढली आहे. मतदानापूर्वीचे ४८ तास महत्त्वाचे असल्याने राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालींवर निवडणूक पथकांचा करडी नजर राहणार आहे. पदयात्रा, गाठीभेटी, कोपरा सभा आणि जाहीर सभांमधून केलेली आश्वासनांची खैरात, आरोप प्रत्यारोपांचे सोडलेले शाब्दीक बाण आणि टीकेला प्रतिउत्तराने दिलेल्या जबाबामुळे रामटेक मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीदरम्यानचा शेवटच्या सोमवार उमेदवारांसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढणार आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस हा प्रचाराचा सुपरमंडे ठरणार आहे.!








