राजुरा :- पहाटे सुमारास साधारण ४ वाजता बल्लारशा–सिकंदराबाद डाऊन रेल्वे लाईनवर एक हृदयद्रावक घटना घडली. रेल्वे रूळ ओलांडत असताना सात वर्षांच्या वाघिणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला.
पहिली माहिती स्थानिक रेल्वे गार्ड आणि ट्रॅकवरील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी तत्काळ वनविभागाला संपर्क साधला.
सर्व अवयव सुरक्षित, मृत्यू रेल्वे धडकेमुळेच
वनविभागाचे हॅलो पेट्रोलिंग पथक, तसेच राजुरा वनपरिक्षेत्रातील अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
तपासादरम्यान खालील गोष्टी स्पष्ट झाल्या—
– वाघिणीचे दात, नखे आणि अन्य अवयव पूर्णपणे साबुत
– मृतदेह डाऊन लाईनच्या उजव्या बाजूस आढळला
– जखमा आणि स्थिती पाहता मृत्यू ही थेट रेल्वे धडकेची परिणती
त्यामुळे कोणत्याही प्रकारचा शिकार किंवा अवयव काढण्याचा गुन्हा नसल्याचे प्राथमिकरित्या स्पष्ट झाले आहे.
या दुर्घटनेनंतर वनविभागातील वरिष्ठ अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.
एम. बी. गिरटकर,उपविभागीय वन अधिकारी (राजुरा)
-जी. आर. इंगळे,वनपरिक्षेत्र अधिकारी (राजुरा)
दोन्ही अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून पंचनामा केला. रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूंचे निरीक्षण, पगमार्क तपासणी आणि विहंगावलोकन करण्यात आले.
मृतदेह चंद्रपूर T.T.C. येथे पोस्टमार्टेमसाठी रवाना
निर्धारित प्रक्रियेप्रमाणे वाघिणीचा मृतदेह चंद्रपूर टायगर ट्रान्झिट सेंटर (TTC) येथे पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचे अचूक कारण, जखमांची तीव्रता आणि वेळ निश्चित होणार आहे.




