spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जागतिक एड्स दिन १ डिसेंबर २०२५ निमित्त गडचिरोली जिल्हयात जनजागृती सायकल रॅली संपन्न

गडचिरोली :- १ डिसेंबर जागतिक एड्स दिनाची थीम “Overcoming disruption, transforming the AIDS Response – अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/ एड्सला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू!” हे घोषवाक्य असुन या अतर्गत दिनांक १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजित जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथुन कारगिल चौक परत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली या ठिकाणी समारोप करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ माधुरी किलनाके, प्रमुख पाहुणे डॉ. मेश्राम, एआरटी नोडल अधिकारी डॉ. नागदेवते, डॉ. प्रशांत पेदांम, वैद्यकिय अधिक्षक महिला व बाल रुग्णालय, डॉ. अभिषेक गव्हारे , महेश भांडेकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, प्रा. चरडे , विहाण, कबिर निकुरे, शासकिय नर्सींग स्कुल, फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले नर्सींग स्कुल, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते. सदर कार्यक्रमामध्ये पथनाटय सादर करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यानी एचआयव्ही एड्सविषयी मार्गदर्शन केले तसेच मार्गदर्शनामध्ये मा. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ माधुरी किलनाके, यांनी जिल्हास्तरावरील आकडेवारी, तपासणी केंद्र व एआरटी सेन्टर या विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे संचालन सविता वैद्य व राजेश गोंडाने व आभार प्रदर्शन रामटेके सिस्टर यांनी केले. संपुर्ण कार्याक्रमाचे आयोजन डॉ. अभिषेक गव्हारे तसेच जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे.

Popular Articles